फैजुपरात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 12:41 IST2017-07-21T12:41:17+5:302017-07-21T12:41:17+5:30

सततच्या चोरी-घरफोडीमुळे शहरवासीयांमध्ये घबराट पसरली आहे.

Fazupreet burglary at two places in one night | फैजुपरात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी

फैजुपरात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी

लाईन लोकमतफैजपूर, जि.जळगाव, दि. 21 - यावल तालुक्यातील फैजपूर येथील भुसावळ रोडवरील रहिवासी माजी नगरसेवक केतन किरंगे यांच्या घरात चोरटय़ांनी प्रवेश करीत घरातील सामान अस्ताव्यस्त केला. मात्र चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान चोरटय़ांनी याच ठिकाणी वास्तव्यास असलेले आणि बाहेर गावी गेलेले सुरेश राणे यांच्या घरावरही डल्ला मारण्याचा प्रय} केला. तेथेही त्यांनी सामान इकडे तिकडे फेकले. या ठिकाणी नेमका किती ऐवज चोरीला गेला हे कळू शकले नाही. फैजपूर शहरातील चोरीची आजची दहावी घटना आहे. सततच्या चोरी-घरफोडीमुळे शहरवासीयांमध्ये घबराट पसरली आहे.

Web Title: Fazupreet burglary at two places in one night