शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पितृ दिन विशेष- शिक्षण घेत असतानाच आई वारल्याने वडीलच झाले 'आई'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 08:43 IST

पितृ दिनानिमित्त जितेंद्र शिंदे यांनी व्यक्त केल्या आपल्या भावना-

प्रमोद पाटील

कासोदा, ता. एरंडोल, जि.जळगाव : शालेय शिक्षण घेत असतानाच दीर्घ आजाराने आई वारली, पण तत्पूर्वी आईच्या आजारपणाचा मोठा खर्च, त्यानंतर आलेला अकाली मृत्यू, पुढे माझे शिक्षण अशी दुहेरी जबाबदारी मला नोकरी लागेपर्यंत वडिलांनाच पार पाडावी लागली आहे. आई-वडील व परमेश्वर हे सर्वकाही माझ्यासाठी वडीलच आहेत, अशा भावना जितेंद्र अजाबसिंग शिंदे याने व्यक्त केल्या आहेत.२० जूनला साजऱ्या होणाऱ्या पितृदिनानिमित्त जितेंद्रने आपल्या भावना व्यक्त केल्या.अजाबसिंग बळीराम शिंदे हे तसे मूळचे जैतपीर ता.अमळनेरचे. पण आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असल्याने त्या काळी अकरावीच्या वर्गानंतर पोटापाण्यासाठी अमळनेर सोडून यवतमाळ, जळगाव, मुंबई अशा ठिकाणी कामासाठी जावे लागले,पुढे टेलरींगचा कोर्स केल्यानंतर परत अमळनेर येथे येऊन सुशिक्षित बेरोजगारांसाठी टेलरींग काम शिकवण्याचे क्लास सुरू केले. त्यातच पत्नीला गंभीर आजार जडला. पत्नीचा आजारपणाचा खर्च नऊ वर्षे केला.आई वारल्यानंतर चार बहिणी व मी अशांच्या शिक्षणाचा खर्च व कुटुंबातील खर्च यांची सांगड घालताना नाकीनऊ येत असतानाच मोठ्या धीराने व आत्मविश्वासाच्या जोरावर वडिलांनी चार बहिणींचे लग्न व मला इंजिनिअर बनवण्याचे अशक्यप्राय स्वप्न लीलया पार पाडले आहे.वडिलांचे जास्त शिक्षण झालेले नसताना तसेच आम्ही खुल्या प्रवर्गात मोडत असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी आरक्षणाची सवलत नव्हती. योग्य कॉलेज शोधणे, त्या कॉलेजची महागडी फी भरणे, जेवण व राहण्याचे खर्च हे मोठे दिव्य काम त्यांनी पार पाडले आहे.ते माझ्यासाठी वडिलांसोबतच ह्यआईह्णपणपण बाप हा बाप असतो. निधड्या छातीने संकटांवर मात करण्याचे कसब त्याला कुठल्याही शाळेत शिकायला जावे लागत नाही. आपल्या एकुलत्या मुलांसाठी कष्ट करायला चार हात करण्यासाठी त्याची इम्युनिटी दहा पट वाढते. असे धिरोदात्त माझे पिता अजबसिंग शिंदे यांनी मला उच्च शिक्षित इंजिनिअर बनवले. देशातील अग्रगण्य अशा एका नामांकित कंपनीत मुंबईत प्रोग्राम मॅनेजर अशा महत्त्वाच्या पदावर मी कार्यरत आहे. याचे श्रेय माझ्या जन्मदात्याला जाते. ते माझ्यासाठी वडिलांसोबतच ह्यआईह्णपण आहेत, अशी भावनाही जितेंद्र अजाबसिंग शिंदे याने व्यक्त केली.

टॅग्स :Father's Dayजागतिक पितृदिनErandolएरंडोल