शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
2
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
3
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
6
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
7
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
8
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
9
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
10
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
11
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
12
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
13
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
14
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
15
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
16
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
17
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
18
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
19
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
20
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू

वडिलांकडून मिळाले फौजदारी कायद्याचे धडे अ‍ॅड.अकील इस्माईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:07 IST

सुनील पाटील जळगाव : कायद्यात झालेल्या दुरुस्त्या, बदल, गुन्ह्याचे स्वरूप व न्यायालयात पक्षकाराची प्रभावी बाजू मांडण्यासाठी काय तयारी असावी, ...

सुनील पाटीलजळगाव : कायद्यात झालेल्या दुरुस्त्या, बदल, गुन्ह्याचे स्वरूप व न्यायालयात पक्षकाराची प्रभावी बाजू मांडण्यासाठी काय तयारी असावी, कायद्याचा अभ्यास कसा करावा याचे धडे वडिलांकडूनच मिळाले, म्हणूनच आज गाजलेल्या खटल्यांमध्ये काम करणे शक्य होत असल्याचे अ‍ॅड.अकिल इस्माईल यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.जळगाव नगरपालिकेच्या घरकुल प्रकरणापासून अधिक चर्चेत आलेले अ‍ॅड.अकील इस्माईल यांचे वडील अ‍ॅड.एस.एम.इस्माईल हे एकेकाळी जळगावचे नामवंत वकील. वकील, कायद्याचे धडे देणारे प्राध्यापक व धर्मदाय आयुक्त व नंतर पुन्हा वकीली व्यवसाय असा त्यांचा प्रवास. अ‍ॅड.एस.एम.इस्माईल यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगावात झाले. महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले व तेथेच त्यांनी शासकीय विधी महाविद्यालयात वकीलीचे शिक्षण पूर्ण करुन १९४९ मध्ये वकीलीची सनद घेतली. १९५२ पर्यंत तीन वर्ष त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकीली केली. १९५२ ते १९५८ जळगावात वकीली व्यवसाय केला. १९५८ मध्ये धर्मदाय आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. कोल्हापुर, नागपूर व मुंबई या मोठ्या शहरात नोकरी केल्यानंतर १९७२ मध्ये धर्मदाय आयुक्त पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १९८६ पर्यंत जळगावातील एस.एस.विधी मनियार महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. नंतर १९९९ पर्यंत पुन्हा वकीली व्यवसायाकडे वळले. २००६ मध्ये त्यांचे निधन झाले.एस.एम. इस्माईल यांनी देशात गाजलेले खटले चालविलेएस.एम. इस्माईल यांनी त्यांच्या काळात चोपडा येथील मुन्ना खून खटला, भडगाव तालुक्यातील रोकडा फार्म येथील कन्हैय्या बंधू तसेच जळगावचे सेक्स स्कॅँडल हे तीन गाजलेले खटले चालविले. कन्हैय्या बंधूंच्या खटल्यात तर एक पोलीस अधिकारी व १४ पोलीस आरोपी होते.अन् मुलाने चालविला वारसावडीलांपासून वसा घेऊन मुलगा अ‍ॅड.अकील इस्माईल यांनी त्यांचा वारसा पुढे सुरुच ठेवला तो आजही सुरु आहे. अ‍ॅड. अकील इस्माईल यांनी १९९० मध्ये वकीलीची सनद घेतली. १९९९ पर्यंत त्यांनी वडीलांसोबत राहून सहाय्यक म्हणून काम केले. त्याच काळात एस.एस.मनियार विधी महाविद्यालय प्राध्यापक म्हणून देखील काम केले. खटला चालवितांना साक्षदारांची उलटतपासणी कशी घ्यावी, वैद्यकिय अधिकाऱ्यांना न्यायालयात कशा पध्दतीने प्रश्न विचारावेत, दोषारोपपत्राच अभ्यास, त्यातील उणिवा, प्रामाणिपणे पक्षकाराची बाजू मांडणे यावर वडीलांनी जास्त भर दिला व त्याचीच माहिती मुलाला सांगितली. वकील व्यवसायापेक्षा प्राध्यापक म्हणून काम करतानाचा आनंद अधिक असल्याचे अकील इस्माईल म्हणतात.बाललैंगिक अत्याचाराचा कायदा चांगला, मात्र दुरुपयोग नकोगुन्ह्यांचे बदलते स्वरुप व त्यानुसार कायद्यात झालेला बदल याबाबत अ‍ॅड.अकिल इस्माईल सांगतात की, महिलांच्या छळासाठी ४९८ कलमान्वये गुन्हा दाखल होतो. पूर्वी या गुन्ह्यात आरोपीला अटक व्हायची. न्यायालयाने केलेल्या निरीक्षणात या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे लक्षात आले, त्यामुळे न्यायालयाने या कलमात अटकेची अट शिथील केली. त्याशिवाय आता थेट गुन्हाही दाखल होत नाही झाला तरी त्यात लगेच अटक होत नाही.आधी हे प्रकरण महिला सहाय्य कक्षाकडे समुपदेशनासाठी येते. तेथे तडजोड झाली नाही किंवा खरोखरच पतीचा दोष असेल तर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली जाते. त्याच पध्दतीने अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढल्याने बाललैंगिक कायद्यात सुधारणा करुन हा गुन्हा अजामीनपात्र करण्यासह जलदगतीने चालवून न्यायालयातही लवकर शिक्षा लागते. अशा गुन्ह्यांना जरब बसावी या हेतूने कायद्यात सुधारणा करण्यात आल्या, त्या योग्यच आहे. काही प्रकरणात वचपा काढण्यासाठी अशा मुलींचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तसेही होता कामा नये.बलात्काराची तक्रार असेल तर थेट गुन्हा दाखल करायला हरकत नाही, कारण त्यात वैद्यकिय पुराव्याचा आधार असता, मात्र विनयभंग सारख्या प्रकरणात चौकशीअंतीच गुन्हा दाखल व्हावा असे मत त्यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव