बापाने मुलाच्या डोक्यात टाकला कोयता

By Admin | Updated: June 6, 2017 11:14 IST2017-06-06T11:14:42+5:302017-06-06T11:14:42+5:30

विशाल अनिल जाधव या मुलाच्या डोक्यात वडिलांनी ऊस तोडण्याचा कोयता टाकून गंभीर जखमी केल्याची घटना रामदेववाडी, ता.जळगाव येथे रविवारी घडली.

Father put the child in his head | बापाने मुलाच्या डोक्यात टाकला कोयता

बापाने मुलाच्या डोक्यात टाकला कोयता

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.6 : दारु मुळे लगA जुळण्यात अडचणी येत असल्याचे सांगणा:या विशाल अनिल जाधव (वय 23 रा.रामदेववाडी) या मुलाच्या डोक्यात वडिलांनी ऊस तोडण्याचा कोयता टाकून गंभीर जखमी केल्याची घटना रामदेववाडी, ता.जळगाव येथे रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता येथे घडली. जखमी तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर बाप अनिल पुना जाधव फरार झालेला आहे.
रामदेववाडीतील रहिवासी अनिल हा प}ी करुणाबाई, तीन मुले विशाल, रवींद्र व मिथुन यांच्यासह राहतो. अनिलला दारुचे व्यसन आहे. सततच्या दारु पिण्यामुळे मुलगा विशाल याने ‘तुम्ही दररोज दारु पिऊन येतात व शिवीगाळ करतात त्यामुळे तिन्ही भावांचे लगA जुळत नाही’ त्यापेक्षा आम्हाला लहानपणीच मारुन का टाकले नाही? असे बोलला. त्यामुळे अनिलने ‘मी तुला आत्ताच मारु टाकतो’ असे म्हणत ऊस तोडण्याचा कोयता विशालच्या डोक्यात टाकला. रक्तबंबाळ अवस्थेत विशालला इतर भावांनी तातडीने जळगावातील खासगी क्रिटीकल सेंटरला दाखल केले. मुलगा रवींद्र याने दिलेल्या फिर्यादीवरुन वडील अनिल जाधव याच्याविरुध्द खुनाचा प्रय} केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Father put the child in his head