शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

मुक्या बापाची लेक सर्व उपक्रमात नंबर एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:39 IST

धरणगाव येथे मुख्याध्यापकांच्या कवितेचे सातवीच्या विद्यार्थिनीने केले रसग्रहण

धरणगाव, जि.जळगाव : घरात कुठलेही शैक्षणिक वातावरण नसताना अवांतर वाचनाच्या सवयीने ‘एका मुक्या बापाची लेक सर्व शालेय उपक्रमात ‘नंबर एक’ पटकावित आपला ठसा उमटवत आहे. या सातवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या वैशाली संजय रावतोळे या विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांनी शतकमहोत्सवी वर्षात लिहिलेल्या कवितेचे समीक्षण केले. बालिकेने केलेले समीक्षण आणि रसग्रहण शिक्षकांना आवाक करणारे ठरले.पी.आर. हायस्कूलच्या शतक महोत्सव सन २०१४ मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत झाला होता. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एन. चौधरी यांनी ‘पी.आर.गीत’ रचले होते. त्यात त्यांनी शाळेच्या १०० वर्षांची यशोगाथा मांडली होती. हे गीत इयत्ता सातवीच्या वर्गातील वैशाली रावतोळे या चिमुकलीने वाचले. तिला हे गीत भावल्याने तिने घरी या गीताचे समीक्षण लिहून मुख्याध्यापक चौधरी यांना दाखवले असता हे समीक्षण वाचून ते चकीत झाले. एवढ्यावरच न थांबता तिने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर या गीताचे रसग्रहण करण्याची संधी मागितली आणि आपल्या ओघवत्या वक्तृत्वाने तिने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.वैशाली हिच्या घरची परिस्थिती गरिबीची असून तिचे वडील मुके आहेत. एका मुक्या बापाची लेक प्रत्येक उपक्रमात सहभाग नोंदवून नंबर एक पटाकावते हे विशेष आहे.तिच्या रसग्रहणाने भारावून मुख्याध्यापक बी.एन.चौधरी, उपमुख्याध्यापक एस.एम.अमृतकार, पर्यवेक्षक डॉ.संजीवकुमार सोनवणे, शिक्षक आर.के.सपकाळे, बी.डी. शिरसाठ, के.आर.वाघ, शरदकुमार बन्सी, डी.एस.पाटील यांनी वैशाली रावतोळेला शतकमहोत्सवी स्मृतीचिन्ह, गुलाबपुष्प, रंगपेटी देवून तिचा गौरव केला. शिक्षकांनी तिला ७५१ रुपयांचे रोख बक्षीस देवून तिच्या शैक्षणिक साहित्यासाठी मदत केली.

टॅग्स :Educationशिक्षणDharangaonधरणगाव