मुलाच्या विरहाने पित्याचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:16+5:302021-03-27T04:17:16+5:30

पिंप्राळा येथील पाटील वाड्यातील रहिवासी व ठेकेदार गोकुळ धनसिंग पाटील (५५) यांचे अल्पशा आजाराने १९ रोजी निधन झाले. त्यांचे ...

The father also died due to the bereavement of the child | मुलाच्या विरहाने पित्याचाही मृत्यू

मुलाच्या विरहाने पित्याचाही मृत्यू

पिंप्राळा येथील पाटील वाड्यातील रहिवासी व ठेकेदार गोकुळ धनसिंग पाटील (५५) यांचे अल्पशा आजाराने १९ रोजी निधन झाले. त्यांचे वडील धनसिंग शंकर पाटील (९२) हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने अंथरुणावर होते.

मुलगा गोकुळ याच्या मृत्यूचा त्यांना धक्का बसला. त्या दिवसापासून त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. शुक्रवारी दुपारी २.४० वाजता त्यांनी मुलाच्या आठवणीत अखेरचा श्वास घेतला.

धनसिंग पाटील हे पिंप्राळा येथील सर्वांत वयस्क व्यक्ती होते. त्र्यंबकदादा म्हणून ते परिचित होते. गावातील रथाला अनेक वर्षे मोगरी लावण्याचे काम त्यांनी केले. मोगरीची ही कला त्यांनी आपली मुले व नातू आणि गावातील अनेक तरुणांनाही शिकविली. तरुणपणी त्यांनी आखाडाही गाजविला होता. या वयातही ते रथोत्सवात आखाडा खेळायचे.

धनसिंग पाटील यांना चार मुले, त्यापैकी लहान मुलाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

शुक्रवारी सायंकाळी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पिंप्राळा येथील भिका व रघुनाथ पाटील यांचे वडील होत.

Web Title: The father also died due to the bereavement of the child