उपोषण, रास्ता रोको आंदोलनाने गाजला दिवस
By Admin | Updated: October 6, 2015 01:09 IST2015-10-06T01:09:23+5:302015-10-06T01:09:23+5:30
प्रशासनाला निवेदन : रावेरला वाहतूक ठप्प : कार्यकत्र्याना अटक व सुटका : यावलला उपोषणाची यशस्वी सांगता

उपोषण, रास्ता रोको आंदोलनाने गाजला दिवस
रावेर/यावल : विविध मागण्यांसाठी रावेरला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तर यावलला शनिवारपासून सुरू असलेल्या उपोषणाची सोमवारी यशस्वी सांगता झाली़ प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े 4रावेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)तर्फे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष विक्की तायडे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गाढे व जिल्हा सरचिटणीस जगदीश कोचुरे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसंदर्भात रावेर-ब:हाणपूर राज्य महामार्गावर सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अर्धा तास रास्ता रोको आंदोलन झाले. खिरवड, दसनूर व रमजीपूर गावांचे पुनवर्सन करा, दसनूर, चिनावल व अहिरवाडी येथे बौद्ध विहार व सामाजिक सभागृह उभारावे, विवरे येथील प्लॉटस् नावावर लावून घरकुलाचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी आंदोलन झाल़े 4यावल वडर वाडय़ातील रस्ता व गटारी संपूर्णपणे खचल्याने नवरात्रीपूर्वी रस्ता व गटारींचे काम पूर्ण करावे या मागणीसाठी राकाँचे कामराज घारू व नथ्थू शिंदे, हिरामण शिंदे, नितीन शिंदे, भैया शिंदे हे उपोषणार्थी शनिवारपासून पालिकेसमोर उपोषणाला बसले होते. माजी आमदार शिरीष चौधरी, रमेश चौधरी, प्रभाकर सोनवणे, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, बाळासाहेब शिर्के, भगतसिंग पाटील, किरण तडवी यांनी भेट देऊन उपोषणार्थीच्या वतीने पालिकेचे कार्यालय अधीक्षक रमाकांत मोरे यांच्याशी चर्चा केल्यांनतर यशस्वी तोडग्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.