घराचा हक्क मिळण्यासाठी भडगावी आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:23 IST2019-11-29T22:23:30+5:302019-11-29T22:23:38+5:30
तालुका बचाव कृती समितीचे निवेदन : अधिकारी फिरकलेच नाहीत

घराचा हक्क मिळण्यासाठी भडगावी आमरण उपोषण
भडगाव : शहरातील यशवंतनगर, टोणगाव, पेठ, कराब या भागातील भोगवटाधारक असलेल्यांना त्यांचे मालकी हक्क देऊन नावे त्वरित लावण्यात यावीत, या मागणीसाठी भडगाव तालुका बचाव कृती समितीचे अध्यक्ष अनिल वाघ यांच्यासह पदाधिकारी आमरण उपोषणास बसले आहेत.
२८ रोजी यशवंतनगर भागातील मारोती मंदिराजवळ उपोषणास सुरुवात झाली. याबाबत मागणीचे निवेदन समितीचे अध्यक्ष अनिल वाघ यांनी तहसीलदार माधुरी आंधळे यांना दिले आहे. उपोषणास अनिल वाघ, हिरामण पाटील, राहुल ठाकरे, सलमानखान यांच्यासह नागरिक बसलेले आहेत. उपोषणस्थळी परिसरातील नागरिकांची पाठिंबा म्हणून मोेठी उपस्थिती होती. दुपारी पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, नगरसेविका योजना पाटील, दलित विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे आदींनी भेट देउन चर्चा केली. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही, अशी खंत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली.