तुटलेल्या विद्युत तारेने घेतला शेतकऱ्याचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 21:11 IST2019-08-11T21:11:11+5:302019-08-11T21:11:39+5:30
खर्दे शिवारातील घटना, साळव्यात शोककळा

तुटलेल्या विद्युत तारेने घेतला शेतकऱ्याचा बळी
धरणगाव : तालुक्यातील साळवा येथील ३८ वर्षीय शेतकºयाचा वीज खांब्यावरील तुटलेल्या तारेमुळे मृत्यू झाल्याची घटना ११ रोजी घडली.
प्रभाकर मधुकर पाटील(वय ३८) असे मयत शेतकºयाचे नाव असून ११ रोजी १५ दिवसानंतर पावसाची उघडीप झाल्याने सकाळी १० वाजता ते आपल्या खर्दे शिवारातील शेतात पीकावर फवारणी करण्यासाठी गेले होते. यावेळी शेतात वीजेच्या खांब्यावरील तुटलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांना शॉक लागला व त्यांचा शेतातच जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेचे वृत्त कळताच वीज कंपनीचे ग्रामीण उपअभियंता सांळूंखे, सपोनि पवन देसले, सहा.फौजदार गंभीर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ..प्रसाद पाटील यांनी शवविच्छेदन केले. संध्याकाळी ७ वा.साळवा येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यस:स्कार करण्यात आले.
मयत प्रभाकर पाटील यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी , एक मुलगा, एक मुलगी , दोन भाऊ असा परिवार आहे. ते रविंद्र व संजय पाटील यांचे बंधू होत.