शेतक:यांनीच पकडले चार कापूस चोर
By Admin | Updated: October 25, 2015 23:52 IST2015-10-25T23:52:21+5:302015-10-25T23:52:21+5:30
शिंदखेडा : शेतांमधून रात्री कापूस चोरून नेणा:या चार चोरटय़ांना शेतक:यांनीच पकडून दिल्याची घटना शिंदखेडा शिवारात घडली

शेतक:यांनीच पकडले चार कापूस चोर
शिंदखेडा : शेतांमधून रात्री कापूस चोरून नेणा:या चार चोरटय़ांना शेतक:यांनीच पकडून दिल्याची घटना शिंदखेडा शिवारात घडली. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याकडून कापूस खरेदी करणा:या व्यापा:यांवरही कारवाईची मागणी शेतक:यांनी केली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. शिंदखेडा परिसरात सध्या शेतांमध्ये कापूस चोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी रात्री समूहाने शेतांकडे गस्त घालतात. अशाच गस्तीवेळी शनिवारी रात्री शेतक:यांना चोरटे शेतांमध्ये आल्याचे समजले. त्यामुळे भटू पाटील, रणजित राजपूत, दिलीप राजपूत, भगवान राजपूत, उमेश राजपूत, संदीप राजपूत, दगेसिंग राजपूत, रणजित राजपूत, जयेश राजपूत, रजेसिंग राजपूत या शेतक:यांनी मोटारसायकलींवर रात्री 11 वाजेच्या सुमारास शेताकडे धाव घेतली. त्यांना भगवान दगेसिंग राजपूत यांच्या शेतात चोरटे कापसाची चोरी करताना दिसले. त्यापैकी चार चोरांना रंगेहाथ पकडण्यात शेतक:यांना यश आले. पकडलेल्या चोरटय़ांमध्ये भरत ईन्नत भिल (18), पुंज्या रोहिदास देवरे (भिल), गोपाल धडू भिल व बंशी गुलाब भिल सर्व रा.साबरहट्टी भिलाटी शिंदखेडा यांचा समावेश आहे.