विषप्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 17:44 IST2019-07-25T17:44:25+5:302019-07-25T17:44:29+5:30
-- मारवड, ता.अमळनेर : येथून जवळच असलेल्या एकलहरे येथील शेतकºयाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २४ जुलै ...

विषप्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या
--
मारवड, ता.अमळनेर : येथून जवळच असलेल्या एकलहरे येथील शेतकºयाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २४ जुलै रोजी घडली.
सुनील गुलाब पाटील (वय ३९, रा.एकलहरे ) यांंनी हिंमत निंबा कोळी यांच्या शेताच्या शिवेजवळ विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. २४ रोजी रात्री शिरपूर येथून गावी घराकडे परत येत असताना ही घटना घडली. सकाळी शेतात गेलेल्या मजुरांना हा प्रकार लक्षात आला असता त्यांनी सामाजिक कार्यकर्ते तानाजी पाटील व सुरेश पाटील यांना याबाबत कळविले. त्यांनी मारवड पोलीस ठाण्यात माहिती दिली. तसेच त्यांना अमळनेर येथील रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर बँक आॅफ महाराष्ट्रचे पीक कर्ज व ठिबकचे कर्ज होते. तसेच पैशांअभावी त्यांनी बी-बियाणे व खतेदेखील उधारीवर घेतल्याचे समजले.