कंकराज येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:41 IST2020-01-23T00:41:10+5:302020-01-23T00:41:15+5:30
पारोळा : तालुक्यातील कंकराज येथील ७५ वर्षीय शेतकऱ्याने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ रोजी पहाटे ...

कंकराज येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पारोळा : तालुक्यातील कंकराज येथील ७५ वर्षीय शेतकऱ्याने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ रोजी पहाटे साडे तीन वाजता घडली.
याबाबत माहिती अशी की, विक्रम तंगा खैरनार (वय ७५) यांनी २२ रोजी पहाटे घराच्या छतावरील लाकडी दांडीस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ते शेती व्यवसाय करीत होते. त्यांची कंकराज शिवारात पाच बिघे शेती असून त्यावर उदरनिर्वाह चालत होता.
दरवर्षी नापिकीमुळे घरखर्च चालवण्यासाठी मोलमजुरी करावी लागत असे. शेतीच्या झालेल्या कर्जापोटी ते सतत निराश होते. या नैराश्यातून त्यांनी गळफास घेऊन जीवन संपविले.
याबाबत भैय्या विक्रम खैरनार यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक फौजदार अशोक कुणबी हे पुढील तपास करीत आहेत.