शेतकऱ्याच्या मुलाची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत झेप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST2021-07-26T04:15:21+5:302021-07-26T04:15:21+5:30

गुढे येथील शेतकरी चुडामण भिला चौधरी यांचा मुलगा हा पहिलीपासूनच अभ्यासात हुशार होता. त्याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्याच्या ...

Farmer's son jumps to US for higher education ... | शेतकऱ्याच्या मुलाची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत झेप...

शेतकऱ्याच्या मुलाची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत झेप...

गुढे येथील शेतकरी चुडामण भिला चौधरी यांचा मुलगा हा पहिलीपासूनच अभ्यासात हुशार होता. त्याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्याच्या पालकांनी चाळीसगाव येथे पूर्ण केले. शाळेत मनमिळावू शांत आणि हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती. दहावीत त्याने ९८ टक्के गुण संपादन करून भरारी घेतली होती.

अकरावी-बारावी त्याने नाशिक येथे पूर्ण केले. मुंबई येथे आयसीआयसीआय बँकेत चांगल्या पदावर तो सध्या नोकरी करत आहे. त्याच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीत निवड झाल्यामुळे गुढे येथे नेहमी सामाजिक उपक्रम राबवणारी स्माईल प्लीज फाउंडेशनच्यावतीने संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या मंदिरात नुकताच त्याच्या पालकांचा आणि त्याचा सत्कार आणि शुभेच्छा देणारा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे सूूत्रसंचालन प्रा. शिक्षक दीपक भालेराव यांनी केले. दीपक पाटील, मंजूर खाटीक यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते. त्याचबरोबर गुढे ग्रामपंचायत येथेदेखील त्यांच्या पालकांचा आणि त्याचा सत्कार सरपंच प्रकाश कृष्णराव पाटील, उपसरपंच विनोद चौधरी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या माध्यमातून नुकताच करण्यात आला.

250721\img_20210627_085713.jpg~250721\25jal_7_25072021_12.jpg

अनिकेत चौधरीचा स्माईल प्लीज फाऊंडेशनच्या वतीने करतांना सदस्य~शेतकऱ्याच्या मुलाची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत झेप.....

Web Title: Farmer's son jumps to US for higher education ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.