जळगाव जिल्ह्यातील शेतकरी 1 जूनपासून संपावर
By Admin | Updated: May 16, 2017 18:08 IST2017-05-16T18:08:02+5:302017-05-16T18:08:02+5:30
मागण्याठी जिल्हाभरातील 10 ते 12 हजार शेतकरी 1 जूनपासून संपावर जाणार आहेत

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी 1 जूनपासून संपावर
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 16 - शेतमालाचे हमीभाव शासकीय कर्मचा:यांना मिळणा:या भत्ते व इतर सवलतीच्या टक्केवारी प्रमाणे दिले जावेत, शेतक:यांना निवृत्ती वेतन लागू करावे, सरसकट कर्ज माफी दिली जावी यासह इतर प्रमुख मागण्याठी जिल्हाभरातील 10 ते 12 हजार शेतकरी 1 जूनपासून संपावर जाणार आहेत. चोपडा येथील शेतकरी कृती समितीच्या नेतृत्वामध्ये हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये जिल्हाभरातील अधिकाधिक शेतकरी सहभागी व्हावेत यासाठी येत्या शनिवारी म्हणजेच 20 रोजी जळगावात कृती समितीची शेतकरी मंडळे, संस्था यांच्यासोबत बैठक आहे.
या समितीला काँग्रेस व राष्ट्रीवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. लवकरच समितीचे मुख्य प्रवर्तक एस.बी.पाटील, अॅड.साहेबराव सोनवणे, डॉ.रवींद्र निकम हे भाजपासह शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असून, या संपाला पाठिंबा देण्याची मागणी करणार असल्याचे एस.बी.पाटील म्हणाले.
सरसकट कजर्माफी दिली जावी, शेतक:यांना निवृत्ती वेतन योजना लागू करावी, हमीभाव वाढविले जावेत, सरसकट वीजबिलमाफी द्यावी, शेतक:यांच्या मुलांना शिक्षणाचे शुल्क माफ करावे आदी मागण्या या समितीने केल्या आहेत.