शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

शेतकऱ्याने फक्त वर्षभर राबायचेच का? अन् शेवटी त्यांच्या पदरी पडणार केवळ ६,९५० रुपये !

By अजय पाटील | Updated: June 2, 2025 11:30 IST

पाहा, गेल्या ६ हंगामातील हमीभावाची स्थिती...

अजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: केंद्र सरकारने कापसाच्या हमीभावात वाढ करून तो ८ हजार ११० प्रति क्विंटल केला आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, या वाढीव हमीभावासोबतच कापसाच्या लागवड खर्चात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या हंगामातील अनुभव पाहता, वाढीव हमीभाव केवळ कागदावरच राहणार की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी पडणार, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

गेल्या हंगामात शासनाकडून ७ हजार ५०० रुपयांचा हमीभाव असताना, सीसीआयच्या केंद्रावर शेतकऱ्यांना सात हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला, तर खासगी जिनिंगमध्ये ६,५०० ते ६,८०० रुपये क्विंटल एवढ्या दराने शेतकऱ्यांना आपला माल विक्री करावा लागला. त्यात सीसीआयच्या केंद्रावर अनेक अटी-शर्थींमुळेही शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले होते.

गेल्या ६ हंगामातील हमीभावाची स्थिती...

  • २०२०-२१    ५,८२५ 
  • २०२१-२२    ५,७२६ 
  • २०२२-२३    ६, ३८० 
  • २०२३-२४    ७,०२० 
  • २०२४-२५    ७,५२१ 
  • २०२५-२६    ८,११०

असे आहे गणित

  • एकरी खर्च- ३३,६००  
  • एकरी कापूस उतारा- ५ क्विंटल 
  • यंदाचा हमीभाव- ८,११० रुपये क्विंटल 
  • हमीभावाप्रमाणे भाव मिळाल्यास ४०,५५० रुपये 
  • लागवड खर्च काढून होणारा फायदा ६,९५० हजार

शेतमाल किमती घसरण्याचा धोका

रूपेश उत्तरवार, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: केंद्र शासनाने कच्च्या तेलावरील आयात शुल्क १० टक्केने कमी केले. यामुळे खुल्या बाजारात तेलबियाण्याच्या शेतमालाच्या किमती घसरण्याचा धोका आहे. यामुळे कृषी अर्थव्यवस्था मोडणार आहे. खर्चावर आधारित दर शेतमालाला मिळणार नाही. सोयाबीनचे लागवड क्षेत्र यामुळे घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

खरीप हंगाम तोंडावर आहे. याचवेळी केंद्र शासनाने कच्च्या तेलावरील आयात शुल्क १६.५० टक्के केले आहे. पूर्वी कच्च्या तेलावरील खाद्य शुल्क २६.५० टक्के होते. यामध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे पामतेलाच्या किमती ९ रुपये प्रतिकिलोने कमी झाल्या आहेत. तर सोयाबीन तेलाच्या किमती १० रुपये प्रतिकिलोने घसरल्या आहे. तर सूर्यफूल तेलाच्या किमती किलोमागे ११. ५० पैशाने कमी झाल्या आहेत. यामुळे पुढील काळात खाद्यतेल स्वस्त होणार आहे. याचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावर होणार आहे. कच्च्या खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याने शेतमाल खरेदी करताना साेयाबीन प्लॉन्टचे दर क्विंटलमागे १०० रुपयाने कमी झाले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव