मुक्ताईनगरला शेतकरी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:56+5:302020-12-04T04:43:56+5:30

—— प्रशासनाकडून दुर्लक्ष एरंडोल : कोरोना संसर्गाचा कहर आता काहीसा मंदावला आहे. बाधितांची संख्या कमी झाली असली तरी ...

Farmers' front at Muktainagar | मुक्ताईनगरला शेतकरी मोर्चा

मुक्ताईनगरला शेतकरी मोर्चा

——

प्रशासनाकडून दुर्लक्ष

एरंडोल : कोरोना संसर्गाचा कहर आता काहीसा मंदावला आहे. बाधितांची संख्या कमी झाली असली तरी दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. अनेक जण सर्रास मास्क न लावता फिरत असतात.

——

वीज अखंड मिळावी

अमळनेर : परिसरात यंदा रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. पाणीसाठे मुबलक असल्यामुळे शेतकऱ्यांनी गहू, मका, हरभरा, भुईमूग व काही ठिकाणी फळ पिकांची लागवड झाली आहे. पिकांना पाणी देण्यासाठी वीजपुरवठ्याची गरज आहे. बऱ्याच वेळेस भारनियमनाचा त्रास होतो. अखंड वीज मिळावी अशी मागणी आहे.

——

बसस्थानकात घाण

धरणगाव : बसस्थानकात फारशी गर्दी नसताना येथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असते. या ठिकाणी अनेक जण आपली खासगी वाहने लावून अन्यत्र जात असतात. याची दखल घेऊन स्वच्छता ठेवावी अशी मागणी केली जात आहे.

——-

एड‌्स दिन साजरा

धरणगाव : राष्ट्रविकास मायग्रेट टी आय प्रोजेक्ट व आयसीटी विभाग धरणगावतर्फे एड‌्स दिन साजरा करण्यात आला. स्थलांतरित कामगारांसाठी कमल जिनिंग येथे पोस्टर प्रदर्शन झाले. सुनील महाले, समुपदेशक अमोल सुर्यवंशी, ज्ञानेश्वर शिंपी, राजेश्वर काकडे आदी उपस्थित होते.

——-

नवनाथ पवार यांचे यश

चाळीसगाव : सांगवी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे पदवीधर प्राथमिक शिक्षक नवनाथ तापीराम पवार राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) राज्यशास्त्र विषयांमध्ये पात्र झालेले आहेत. परीक्षेचा निकाल ३०रोजी जाहीर झाला आहे. पवार हे राहणार चिपलीपाडा, तालुका- साक्री, जिल्हा - धुळे येथील मूळ रहिवासी आहेत.

Web Title: Farmers' front at Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.