शिवसेनेच्या भगव्या सप्ताहात शेतकरी कजर्मुक्तीचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 14:43 IST2017-05-31T14:43:31+5:302017-05-31T14:43:31+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

Farmer's debt relief in Shiv Sena's Bhagwat week | शिवसेनेच्या भगव्या सप्ताहात शेतकरी कजर्मुक्तीचा नारा

शिवसेनेच्या भगव्या सप्ताहात शेतकरी कजर्मुक्तीचा नारा

ऑनलाइन लोकमत

धरणगाव, जि. जळगाव, दि. 31 : जळगाव जिल्ह्यात 30 मे ते 5 जून शिवसेनेच्या भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून  त्यानिमित्याने बुधवारी धरणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानंदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली  झालेल्या या रास्तारोको आंदोलनात  शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सत्ताधारी सरकारमधीलच शिवसेनेच्यावतीने हे आंदोलन म्हणजे सरकारला घरचा आहेर होता अशी चर्चा यावेळी झाली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील यांना   देण्यात आले . यामध्ये शेतक:यांना लवकरात लवकर कर्जमाफी मिळावी, शेतक:यांना दरमहा 3000 रुपये वेतन द्यावे  इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.  बांभोरी बुद्रुक, ता.धरणगाव येथे  भाजपाच्या शिवार सभेत धुळ्याचे आमदार  अनिल गोटे हे शेतक:यांना ‘बेवडे’ बोलल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळेस शिवसेना जिल्हाप्रमुख  गुलाबराव वाघ, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, सभापती सचिन पवार, तालुकाप्रमुख गजानन पाटील,  विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक पप्पू भावे, वासू चौधरी, विलास महाजन, भागवत चौधरी, नंदू पाटील, सुरेश महाजन, जितू धनगर, विजय महाजन, सुनील चौधरी, धीरेंद्र पुरभे, मोहन महाजन, जानकीराम पाटील,  पी. एम. पाटील, छोटू जाधव, विलास माळी, गोलू चौधरी, राहुल महाजन, नीलेश पाटील, वसीम पिंजारी, आर्य महाजन, सुदर्शन भागवत, जयेश महाजन, रवी कंखरे, पप्पू कंखरे विद्यार्थी सेनेचे विशाल महाजन, राहुल महाजन आदी तसेच सर्व शिवसेना युवासेना विद्यार्थी सेना नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Web Title: Farmer's debt relief in Shiv Sena's Bhagwat week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.