Farmer's death due to pesticide poisoning | कीटकनाषकाची विषबाधा होऊन शेतकऱ्याचा मृत्यू
कीटकनाषकाची विषबाधा होऊन शेतकऱ्याचा मृत्यूअमळनेर : पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री येथील शेतकºयाचा फवारणी करताना मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. शेळावे रस्त्यावरील रत्नापिंप्री शिवारात भगवान आधार पाटील (वय ४५) यांच्या शेतातील मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यासाठी ते मका पिकावर दिल्लीगेट नावाचे कीटकनाशक फवारणी करीत होते. त्यादरम्यान औषधाची विषबाधा होऊन होऊन त्यांचा अचानक मृत्यी झाला. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेव्हा त्यांचा विषारी द्रव्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.

Web Title: Farmer's death due to pesticide poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.