टोळी येथेकर्जबाजारी शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 21:53 IST2019-11-18T21:53:39+5:302019-11-18T21:53:44+5:30
विकासोचे दीड लाख व हात उसनवारी चे होते ६५ हजार कर्ज

टोळी येथेकर्जबाजारी शेतकरी आत्महत्या
पारोळा : तालुक्यातील टोळी येथील धोंडू आत्माराम पाटील (५४) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून १८ रोजी सकाळी विषारी द्रव पदार्थ प्राशन करून आत्महत्या केली.
धोंडू पाटील यांची पत्नी शेतात काम करीत असताना ही घटना त्यांच्या लक्षात आली. यानंतर त्यांना तात्काळ पारोळा कुटीर रुग्णल्यात दाखल केले व प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धोंडू पाटील यांच्यावर विकासो चे दीड लाख व हात उसनवारी चे ६५ हजार असे कर्ज होते. सततच्या नापिकी व आतच्या अतिवृष्टीमुळे सर्व हंगाम हातचा गेल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुली, मुलगा असा परिवार आहे.