देवमोगरा येथे शेतीवरून खून
By Admin | Updated: May 21, 2014 01:23 IST2014-05-21T01:23:16+5:302014-05-21T01:23:16+5:30
शेती हिस्से वाटणीवरून देवमोगरा पुनर्वसन, ता.अक्कलकुवा येथे एकाचा खून झाला.

देवमोगरा येथे शेतीवरून खून
नंदुरबार : शेती हिस्से वाटणीवरून देवमोगरा पुनर्वसन, ता.अक्कलकुवा येथे एकाचा खून झाला. भुरजी रमक्या गावीत (३८) याचा वडिलोपार्जित शेतीच्या हिस्से वाटणीवरून वाद सुरू होता. यावरून याआधी भांडणे झालेली आहेत. त्याचा खेत्या रूपा वळवी याने काठीच्या साहाय्याने खून केला. खेत्या यास अटक करण्यात आली असून, २३ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.