शेतक:यांच्या संपात जळगाव जिल्ह्यातील चार लाख शेतकरी
By Admin | Updated: May 31, 2017 17:47 IST2017-05-31T17:47:24+5:302017-05-31T17:47:24+5:30
शेतमालाच्या आधारभूत किमतींमध्ये वाढ करावी, शेतक:यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च माफ व्हावा

शेतक:यांच्या संपात जळगाव जिल्ह्यातील चार लाख शेतकरी
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 31 - शेतक:यांचा सातबारा कोरा करावा, वीजबिल माफ करावे, खतांवरील अनुदान वाढवावे, शेतमालाच्या आधारभूत किमतींमध्ये वाढ करावी, शेतक:यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च माफ व्हावा आदी मागण्यांसाठी 1 जूनपासून जिल्ह्यातील शेतकरी संपावर जाणार आहेत. या संपात जिल्हाभरातील चार लाख शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती संपाची हाक दिलेल्या किसान क्रांती शेतकरी कृती समितीचे राज्य समन्वयक एस.बी.पाटील यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जे शेतकरी या संपात सहभागी होतील ते पेरतील, पण बाजारात विकणार नाहीत. शहरांमध्ये दूध, भाजीपाला याचा पुरवठा केला जाणार नाही. भाजीपाला व दूध ग्रामीण भागात विक्री करण्यास मुभा आहे. हा संप या खरीप हंगामासाठी आहे. या काळातही शेतक:यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर हा संप पुढेही सुरूच राहील. तसेच संप अधिक तीव्र केला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.
शेतक:यांचा संपाला प्रतिसाद म्हणून 1 रोजी चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे. कुणीही शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत जाणार नाही. तसेच व्यापा:यांनीही प्रतिसाद दिला असून, सौदे होणार नसल्याची माहिती एस.बी.पाटील यांनी दिली.
या संपाला विविध राजकीय पक्षांसह 40 संघटना, संस्थांनी पाठिंबा दिला आहे. हा उत्स्फूर्त संप आहे. सोशल मीडियाद्वारेही संपाला प्रतिसाद मिळत असून, संपात सहभागी होणा:यांची संख्या वाढत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.