भडगाव, जि. जळगाव : भडगाव तालुक्यातील बोदर्डे येथील वामन माणिक पाटील या शेतकºयाने कनाशी शिवारात पेरलेल्या ज्वारी पिकावर रोग पजल्याने (मुर फुटल्याने) हाती उत्पन्न येणार नाही, या नैराश्येतून ज्वारी पिकावर नांगर फिरविला. या शेतकºयाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.भडगाव तालुक्यातील बोदर्डे येथील शेतकरी वामन माणिक पाटील यांनी कनाशी शिवारातील शेतात एक एकर क्षेत्रात ज्वारीचे पीक लावले होते. चांगल्या पावसाने ते तरारलेही. मात्र अचानक पिकावर रोग पडल्याने उत्पन्न येणार नाही या नैराश्येतून वामन पाटील यांनी ज्वारी पिकावर नांगर फिरविण्याचा निर्णय घेतला. यामुळे हजारो रुपये खर्च पाण्यात गेला आहे. प्रशासनाने तात्काळ नुकसानीचा पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे
भडगाव तालुक्यातील बोदर्डे येथील शेतकऱ्याने एक एकर ज्वारीवर फिरविला नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:56 IST