पत्नी बेपत्ता झाल्याने शेतमजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 12:48 IST2017-05-16T12:48:57+5:302017-05-16T12:48:57+5:30
अशोक विनायक पाटील (वय 35) असे मयताचे नाव आहे

पत्नी बेपत्ता झाल्याने शेतमजुराची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
यावल, जि. जळगाव, दि. 16 - पाच दिवसांपासून चिमुकल्या मुलीसह पत्नी बेपत्ता झाल्याने वैफल्यग्रस्त अवस्थेत यावल तालुक्यातील उंटावद येथे शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली़ अशोक विनायक पाटील (वय 35) असे मयताचे नाव आहे. पाटील यांनी घराच्या छताला दोर बांधून गळपास घेत आत्महत्या केली़ त्यांची पत्नी पाच दिवसांपूर्वी गावातून बेपत्ता झाली आहे. जाताना तिने पाच वर्षीय मोहिनी या मुलीलादेखील सोबत नेल्याचे सांगण्यात आल़े त्यामुळे आलेल्या नैराश्यातून अशोक पाटील यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आल़े याबाबत मयताचे वडील विनायक किसन पाटील (उंटावद) यांनी यावल पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़