बोरखेडे येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणातून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 20:34 IST2019-10-05T20:34:23+5:302019-10-05T20:34:27+5:30
बोरखेडे बुद्रुक, ता.चाळीसगाव : येथे ३५ वर्षीय तरुण शेतकर-याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. ...

बोरखेडे येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणातून आत्महत्या
बोरखेडे बुद्रुक, ता.चाळीसगाव : येथे ३५ वर्षीय तरुण शेतकर-याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
प्रमोद रामराव पाटील यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे पीक कर्ज आणि मध्यम मुदत कर्ज २०१७ पासून थकलेले आहे. ते माफ होईल या आशेने कर्ज वाढत गेले. त्यात नैसर्गिक आपत्तींमुळे उत्पन्नातही घट झाली. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असतानाच प्रमोद पाटील यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात कळविले असता पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेने गावात अतिशय दु:ख व्यक्त होत आहे.