कविसंमेलनात शेतकरी आत्महत्या व बोंडअळीचे पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 02:01 IST2018-12-31T01:59:31+5:302018-12-31T02:01:04+5:30
जामनेर , जि.जळगाव : जामनेर येथे रविवारी तावडी बोली मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनातील तिसऱ्या सत्रातील कवी ...

कविसंमेलनात शेतकरी आत्महत्या व बोंडअळीचे पडसाद
जामनेर, जि.जळगाव : जामनेर येथे रविवारी तावडी बोली मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनातील तिसऱ्या सत्रातील कवी संमेलनात सहभागी कवींनी सादर केलेल्या कवितांमधून शेतकरी आत्महत्या, बोंडअळीने ग्रासलेल्या शेतकºयांचे दु:ख मांडले गेले. खूप झाली अच्छे दिनची हौस, नको पाडा घोषणांचा पाऊस’ या कवितेने रसिकांची दाद मिळवली.
कर्जमाफीचा अभ्यास करता करता परीक्षा तोंडावर आली, तुम्ही खुशाल लिहा पेपर, मार्क आम्हीच देणार या कवितेने सामान्य माणसाच्या व शेतकºयांच्या भावना मांडल्या.
ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. मोरेश्वर सोनार यांनी कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन केले.
पहूर येथील ज्येष्ठ कवी मधु पांढरे यांनी समारोप केला. १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या वेळी लिहिलेली कविता त्यांनी सादर केली. संदीप पाटील यांनी आभार मानले.