भूसंपादनाच्या रकमेसाठी पाल रस्त्यावर शेतक:याचा ठिय्या

By Admin | Updated: June 1, 2017 18:05 IST2017-06-01T18:05:04+5:302017-06-01T18:05:04+5:30

उच्च न्यायालयाने आदेश करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नाही तसेच दिलेले आश्वासन न पाळल्याने आंदोलन करण्यात आले

Farmer on Sail road for land donation amount: its position | भूसंपादनाच्या रकमेसाठी पाल रस्त्यावर शेतक:याचा ठिय्या

भूसंपादनाच्या रकमेसाठी पाल रस्त्यावर शेतक:याचा ठिय्या

ऑनलाईन लोकमत

रावेर,दि.1 - तालुक्यातील कुसूंबा बु.।। येथील एका शेतक:याची गावालगतच्या 25 एकर क्षेत्रातील सुमारे दीड कि.मी.लांबीच्या रस्त्यासाठी अंदाजे एक हेक्टर शेती तब्बल 41 वषार्पुर्वी संपादित केली होती. भूसंपादनाच्या रकमेच्या अदायगीबाबत औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आदेश करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नाही तसेच दिलेले आश्वासन न पाळल्याने  संतप्त शेतकरी जयवंतराव शंकरराव जावळे यांनी गुरुवारी थेट रावेर-पाल रस्त्यात ठिय्या मारून रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी संपातच या अन्यायग्रस्त शेतक:याने आंदोलनाचे हत्यार उपसल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले असून एकच खळबळ उडाली आहे. 

Web Title: Farmer on Sail road for land donation amount: its position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.