शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

पिलखेडा येथील शेतकऱ्याने केळीला शोधला पेरुचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:08 IST

ग्रामीण भागात नव्या प्रयोगाची नवलाई : जिल्हा परिषद सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी केली फळबागेची पाहणी, रोज येतात किमान १० ते १२ शेतकरी भेटीला

चुडामण बोरसेजळगाव : केळीवर वारंवार येणारी संकटे आणि नुकसान यावर पिलखेडा येथील किशोर चौधरी यांनी केळीला पेरुचा पर्याय शोधला आहे. किमान किलोभर वजनाचा एक पेरु या फळबागेत येत आहे. हे पेरु आता मुंबईच नाही तर दिल्ली आणि गुजरातच्या बाजारपेठतही पाठविले जात आहेत.जळगावपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिलखेडा येथील किशोर चौधरी आणि त्यांच्या बंधूची ४० एकर शेती आहे. यापैकी १० एकरावर ते फळबाग लावतात तर २० एकरावर केळी लावायचे.किशोर यांच्या दहावीपर्यंत शिक्षण झाले. दहावीत असताना शेतीची जबाबदारी त्यांच्याकडे आली. शेतीमध्ये वेगळे काही प्रयोग करण्याचे विचार तेव्हापासून सुरू झाले. काही वर्षापूर्वी कृषी प्रदर्शनात त्यांनी भला मोठा एक डाळिंब पाहिला होता. याप्रमाणेच आपणही काही प्रयोग करावा असा विचार त्यांच्या मनात आला. पण एक-दीड वर्ष काहीच सूचले नाही. शेवटी चार वर्षांपूर्वी फळबाग योजनेचा विचार मनात आला आणि त्याला लागलीच मूर्त स्वरूप दिले. बाग तयार केली आणि पेरूची लागवड सुरू झाली. ही फळबाग सेंद्रीय पद्धतीने तयार करण्यात आली. आठ एकरात त्यांनी ४६०० पेरू रोपांची लागवड केली आहे. रायपूर (छत्तीसगड) येथून ही रोपे आणण्यात आली. पेरू पिकांना कव्हरींग, फवारणी यासाठी प्रचंड खर्च आला. त्याची तमा न बाळगता त्यांनी या रोपांचे संगोपन केले. यातून मग चांगली फळे आकाराला आली. एक पेरू ८०० ते १००० ग्रॅम वजनाचा आहे.परंपरागत फळ लागवड ही खड्डे खोदून केली जाते. परंतु चौधरी यांनी गादी वाफे तयार करून, त्यात खड्डे करून पेरूची लागवड केली आहे. लागवड करताना ठिंबक सिंचन बसविण्यात आले. यातून या रोपांना मोठ्या प्रमाणात फळ धारणा झाली असून हे पेरू आता मुंबईसोबतच गुजरात आणि दिल्लीच्या बाजारपेठेतही जात आहे. काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी या फळबागेची पाहणी केली.शेतकऱ्यांनी नव- नवीन प्रयोग करायाल हवेत. आमच्याकडील पेरुला अ‍ॅपल टेस्ट आहे, आणि यापुढे त्यातही नवीन काही करुन पेरु परदेशी पाठविण्याचा मानस आहे.-किशोर चौधरी, शेतकरी, पिलखेडा ता. जळगाव.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव