पातोंडा येथे शेतक:याची आत्महत्या
By Admin | Updated: January 12, 2017 00:54 IST2017-01-12T00:54:25+5:302017-01-12T00:54:25+5:30
27 वर्षीय विवाहीत तरुण शेतक:याने आपल्या न्यु प्लॉट भागातील गुरांच्या गोठय़ात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 11 रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली.

पातोंडा येथे शेतक:याची आत्महत्या
पातोंडा : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून येथील एका 27 वर्षीय विवाहीत तरुण शेतक:याने आपल्या न्यु प्लॉट भागातील गुरांच्या गोठय़ात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 11 रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली. समाधान भास्कर बिरारी असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
समाधान याच्या वडिलांच्या नावे आठ ते दहा बिघे कोरडवाहू जमीन आहे. सर्व कुटुंब एकत्रित राहतात. त्यांच्याकडे सोसायटीचे पीक कर्ज आहे. आर्थिक परिस्थिती बिकट न सततच्या नापिकमुळे ते आर्थिक विवंचनेत सापडले. अशा नापिक व कर्जापोटी भ्समाधान बिरारी याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. (वार्ताहर)