मनरद येथे शेतक:याची 25 लाखांत फसवणूक
By Admin | Updated: November 3, 2015 23:56 IST2015-11-03T23:56:39+5:302015-11-03T23:56:39+5:30
शहादा : रोपे तयार करण्यासाठीचे शेड अर्थात पॉली हाऊसचे काम पूर्ण न करता, 25 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना मनरद, ता. शहादा येथे घडली.

मनरद येथे शेतक:याची 25 लाखांत फसवणूक
शहादा : रोपे तयार करण्यासाठीचे शेड अर्थात पॉली हाऊसचे काम पूर्ण न करता, 25 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना मनरद, ता. शहादा येथे घडली. पोलीस सूत्रांनुसार, याबाबतची फिर्याद जगदीश सुदाम पाटील रा. मनरद यांनी दिली आहे. त्यांना मनरद येथे रोपे तयार करण्यासाठीचे शेड (पॉली हाऊस) तयार करावयाचे होते. यासाठी 25 लाख 65 हजार रुपये कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष वीरेंद्र योगीराज भारद्वाज, अभिजित बाळासाहेब चव्हाण दोन्ही रा. सौभाग्य नगर, नाशिक व विजय अजरुन पाटील रा. परिवर्धा, ता. शहादा यांनी दाखविले. रोपे तयार करण्यासाठीचे शेड बनविण्याचे काम बी अॅण्ड सी. हायटेक प्लारी कल्चर या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने रक्कम घेतली, परंतु काम केले नाही. यात आर्थिक फसवणूक झाली असल्याची तक्रार जगदीश सुदाम पाटील यांनी केली आहे. त्यावरून या तिघांविरुद्ध संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मोरे तपास करीत आहेत.