आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.७ : तालुक्यातील कानळदा येथील सुभाष धुडकू पाटील (वय ४८ ) या शेतकºयाने गावाच्या बाहेर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे सात वाजता उघडकीस आली. मुलीच्या लग्नाचे कर्ज तसेच दोन मुलांचे लग्न झालेले नसल्याने आलेल्या नैराश्यातून पाटील यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुभाष पाटील हे मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडले. रात्रभर ते घरी आलेच नाहीत. बुधवारी सकाळी गावाच्या बाहेर हेमराज आनंदा राणे यांच्या शेतात पाटील यांनी गळफास घेतल्याचे रस्त्याने जाणाºया लोकांना आढळून आले. स्वत:च्या शर्टानेच पाटील यांनी गळफास घेतला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस पाटील नारायण गोकुळ पाटील यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी व सहकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
कानळदा येथील शेतक-याने नैराश्यातून शेतात केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 17:14 IST
कर्ज आणि मुलांच्या लग्नाच्या चिंतेतून उचलले टोकाचे पाऊल
कानळदा येथील शेतक-याने नैराश्यातून शेतात केली आत्महत्या
ठळक मुद्देस्वत:च्या शर्टानेच जीवनयात्रा संपविलीजळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदमंगळवारी रात्रभर परत न आल्याने कुटुंबियांनी घेतला शोध