विजेचा धक्का लागून वेल्हाळे येथील शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 05:32 PM2019-07-28T17:32:58+5:302019-07-28T17:34:12+5:30

वेल्हाळा, ता.भुसावळ येथील शेती शिवारात विजेचा धक्का लागून प्रमोद मुरलीधर पाटील (वय ५८) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊला उघडकीस आली

Farmer dies in Vehelhe due to lightning strike | विजेचा धक्का लागून वेल्हाळे येथील शेतकऱ्याचा मृत्यू

विजेचा धक्का लागून वेल्हाळे येथील शेतकऱ्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देनातेवाईकांचा संतापघटनेची चौकशी करण्याचे आश्वासन

वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : वेल्हाळा, ता.भुसावळ येथील शेती शिवारात विजेचा धक्का लागून प्रमोद मुरलीधर पाटील (वय ५८) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊला उघडकीस आली
प्रमोद पाटील हे शनिवारी सकाळी लोणवडी परिसरात स्वत:च्या शेतात शेती कामाकरिता गेले होते. परंतु रात्री घरी परतले नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शेत शिवारात शोध घेतला. परंतु अंधार व सतत पडणाºया पावसामुळे ते सापडले नाही. पुन्हा रविवारी सकाळी शोध घेतला असता शेतात ज्वारीच्या पिकात मृतावस्थेत आढळले.
त्यांच्या शेजारच्या शेताला तारेचे कुंपण आहे. त्यावर विजेची तार खांबावरून तुटून पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्या तारेचा पाटील यांच्या पायाचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला असावा. त्यांच्या पायावर जळाल्याच्या खुणा आढळून आल्या.
नातेवाईकांचा संताप
वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच शेतकºयाचा बळी गेल्याची सर्वत्र चर्चा होती. नातेवाईकानी संताप व्यक्त केल्याने अखेर वीज वितरण कंपनीचे अभियंता धांडे व कविता सोनवणे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेती शिवारातील उघड्या डीपी तसेच लोबवळणाºया विद्युत तार पाहता अजून अपघात होण्याची शक्यता आहे
याबाबत योगेश आत्माराम पाटील यांच्या खबरीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.हे.कॉं.संदीप बडगे करीत आहे

Web Title: Farmer dies in Vehelhe due to lightning strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.