विहिरीत पडून आडगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 23:13 IST2019-10-17T23:13:21+5:302019-10-17T23:13:28+5:30
पारोळा : तालुक्यातील आडगाव येथील ३८ वर्षीय शेतकºयाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. बसराज मांगो राठोड यांनी ...

विहिरीत पडून आडगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू
पारोळा : तालुक्यातील आडगाव येथील ३८ वर्षीय शेतकºयाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला.
बसराज मांगो राठोड यांनी खबर दिली. त्यांचे भाऊ चरणदास मांगो राठोड (३८) हे १५ रोजी शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. ते घरी न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता १७ रोजी त्यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास कैलास शिंदे करत आहेत.