भादली येथे शेतक:याची आत्महत्या
By Admin | Updated: June 22, 2017 13:38 IST2017-06-22T13:37:28+5:302017-06-22T13:38:31+5:30
भादली येथील महेश सूर्यकांत चौधरी(वय 40 ) या तरुण शेतक:याने मध्यरात्री विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना भादली बु.ता.जळगाव येथे घडली.

भादली येथे शेतक:याची आत्महत्या
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.22 - भादली येथील महेश सूर्यकांत चौधरी(वय 40 ) या तरुण शेतक:याने मध्यरात्री विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना भादली बु.ता.जळगाव येथे घडली.
महेश चौधरी यांच्याकडे स्वत:चे साडे तीन बिघे शेती आहे तर काही शेती कराराने करतात. सतत नापिक किंवा दुष्काळ यामुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला होता, शिवाय आताही दुबार पेरणीचे संकट डोळ्यासमोर होते. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे 60 हजार व खासगी असे दोन ते तीन लाखाचे कर्ज त्यांच्यावर होते. चौधरी यांनी मध्यरात्री एक वाजता म्हशीच्या गोठय़ातील विषारी औषध घेत बाहेर रस्त्याच्या कडेला विष प्राशन केले. दरम्यान, याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.