दाम्पत्याकडून शेतकऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:04 IST2019-09-29T00:04:27+5:302019-09-29T00:04:34+5:30
अमळनेर : शेतात जाऊन पती पत्नीने एक शेतकºयास शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना तालुक्यातील गडखांब येथे २८ रोजी घडली. ...

दाम्पत्याकडून शेतकऱ्यास मारहाण
अमळनेर : शेतात जाऊन पती पत्नीने एक शेतकºयास शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना तालुक्यातील गडखांब येथे २८ रोजी घडली.
गडखांब येथील कैलास आत्माराम पाटील यांनी आपल्या शेतातून २० वर्षांपासून वहिवाट दिली आहे. त्यावरून रमेश पाटील जात असताना रस्त्यात मुगाच्या शेंगांचा कचरा टाकलेला असल्याने ते कैलास पाटील यांना बोलायला गेले. त्यावेळी कैलास पाटील व चांदकोर पाटील या दाम्पत्याने रमेश पाटील यांना मारहाण व शिवीगाळ केली. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला पतीपत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहेत.