वाकोद येथे शेत मजुराला शिवीगाळ करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:15 IST2021-05-30T04:15:10+5:302021-05-30T04:15:10+5:30

पहूर, ता. जामनेर : मालक कोठे आहे, अशी विचारणा मजुराकडे केली असता त्याने मालक घरी असल्याचे सांगितल्याचा ...

Farm laborer abused and beaten at Wakod | वाकोद येथे शेत मजुराला शिवीगाळ करून मारहाण

वाकोद येथे शेत मजुराला शिवीगाळ करून मारहाण

पहूर, ता. जामनेर : मालक कोठे आहे, अशी विचारणा मजुराकडे केली असता त्याने मालक घरी असल्याचे सांगितल्याचा राग आल्याने संबंधितांनी मजुराला शेतातच मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केली.

याप्रकरणी पहूर पोलिसांत सात जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकोद शिवारातील जय पांढरे यांच्या शेतात पत्र्याच्या शेडचे काम सुरू आहे. या ठिकाणी मजूर संजय आनंदा निकाळजे सिमेंट कामावर पाणी मारत होते. दरम्यान शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाखाली गजानन शर्मा व विशाल शर्मा यांच्यासह तीन पुरुष व दोन महिला जेवण करीत होत्या. त्यांनी संजयला बोलावून मालक कोठे आहे, अशी विचारणा केली. संजयकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संबंधितांनी मालक जय पांढरे यांना शिवीगाळ केली. संजयने त्यांना विरोध केला असता याचा राग आल्याने संबंधितांकडून जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.

तक्रारीवरून सागर गजानन शर्मा, विशाल गजानन शर्मा, राजेश रामप्रसाद शर्मा, सोनू श्यामप्रसाद शर्मा, मयूर रामप्रसाद शर्मा, संतोषी रामप्रसाद शर्मा, मंगला रामप्रसाद शर्मा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाचोरा विभागाचे डीवायएसपी भरत काकडे करीत आहेत.

Web Title: Farm laborer abused and beaten at Wakod