भडगाव तालुक्यातील वाडे येथे शेतातील पत्र्याचे घर आगीत जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:28 PM2019-09-17T22:28:03+5:302019-09-17T22:30:07+5:30

भडगाव , जि.जळगाव : तालुक्यातील वाडे शिवारातील एकनाथ अर्जुन महाजन यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडच्या घराला अचानक आग लागली. त्यात ...

The farm house was burnt in the fire at Wade in Bhadgaon taluka | भडगाव तालुक्यातील वाडे येथे शेतातील पत्र्याचे घर आगीत जळून खाक

भडगाव तालुक्यातील वाडे येथे शेतातील पत्र्याचे घर आगीत जळून खाक

googlenewsNext
ठळक मुद्देआगीत सुमारे २ लाखांचे नुकसान प्रशासनाने शेतकºयास तत्काळ नुकसान भरपाई द्यावीबादल्या, हंड्यांनी पाण्याचा मारा करून आग विझविली

भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील वाडे शिवारातील एकनाथ अर्जुन महाजन यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडच्या घराला अचानक आग लागली. त्यात संसारोपयोगी वस्तूंसह शेती अवजारे जळून खाक झाली. ही घटना १६ रोजी रात्री घडली. शेजारील शेतकऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने बादल्या, हंड्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. जीवित हानी टळली. मात्र मोठा अनर्थ टळला. या आगीत सुमारे २ लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा वाडे येथील तलाठी माने यांनी केला आहे. प्रशासनाने या शेतकºयास तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या नुकसानग्रस्त कुटुंबासह नागरिकातून होत आहे.
वाडे येथील एकनाथ अर्जुन महाजन यांचे शेतजमीन वडाळे वाघळी रस्त्यालगत आहे. शेतात पत्र्याच्या शेडच्या घरात त्यांचे वास्तव्य होते. घरात संसारोपयोगी वस्तूंसह शेतीसाठी लागणारी अवजारेही होती. रात्री अचानक आग लागली. या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तू, २० थैल्या रासायनिक खते, पाच पोते धान्य, चारा, चारा कुट्टी, २० पीव्हीसी पाईप, पाच ठिबक संचचे बंडल, शेती अवजारे, तीन कृषी वीज पंप, पत्र्याचे शेड, बाजूचे शेड यासह आगीत जळून खाक झाले. या शेडमधून बेलजोडी आदी जनावरे बाहेर रस्त्यावर बांधल्याने वाचली. यादिवशी घरात कुणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला. आगीने भडका पकडपाच शेजारील जितेंद्र पाटील या शेतकºयाच्या लक्षात आले. आरडा ओरड सुरू झाली. छोटू पाटील यांनी या शेतकºयाला आगीची घटना मोबाइलवर सांगताच गावासह शेजारील शेतकऱ्यांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. बादल्या, हंड्यांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. मात्र या आगीत सारे जळून खाक झाले. घटनास्थळी  पोलीस पाटील भूषण पाटील, माजी उपसरपंच देवीदास माळी, वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी, संभाजी पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
छोटू पाटील, संभाजी पाटील, अर्जुन महाजन, श्यामकांत महाजन, एकनाथ महाजन, भोला मिस्तरी, पंकज मोरे, शालिक मोरे, सावता महाजन, भावडू महाजन, रोशन महाजन, आकाश महाजन, रोशन मोरे, राजाराम महाजन, भिला महाजन, विष्णू महाजन यांनी आग नियंत्रित येण्यासाठी परिश्रम घेतले.
 

Web Title: The farm house was burnt in the fire at Wade in Bhadgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.