मुक्ताईनगर येथे गणरायाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST2021-09-21T04:19:10+5:302021-09-21T04:19:10+5:30

मूर्ती संकलनासाठी शहरात जवळपास सहा ठिकाणी केंद्र उभारण्यात आले होते. नगरपंचायत प्रशासनाद्वारे मूर्ती संकलन व निर्माल्य संकलन करण्यात येत ...

Farewell to Ganarayya at Muktainagar | मुक्ताईनगर येथे गणरायाला निरोप

मुक्ताईनगर येथे गणरायाला निरोप

मूर्ती संकलनासाठी शहरात जवळपास सहा ठिकाणी केंद्र उभारण्यात आले होते. नगरपंचायत प्रशासनाद्वारे मूर्ती संकलन व निर्माल्य संकलन करण्यात येत होते. पोलीस विभागतर्फे सर्व रस्त्यांवर आणि पूर्णा नदीच्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या आवाहनानुसार दुपारी दोन वाजेपर्यंत ५० टक्के विसर्जन झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत मोठे गणपती वगळता जवळपास सर्वच गणेश विसर्जन झाले होते.

खामखेडा पुलावरून गावात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. तसेच नदीपात्रात सेवाभावी बोटींची व पोहणाऱ्यांची व्यवस्था प्रशासनाने केली होती. तसेच आलेल्या गणेश भक्तांना नाश्त्याची व पिण्याच्या पाण्याची तसेच पुलाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याच्या कडेला पर्यावरणाबाबत घोषवाक्य असलेले बॅनर मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीतर्फे लावण्यात आले होते. पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नगरपरिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी तसेच मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीचे जवळपास ४० सदस्य गणवेशात रात्री उशिरापर्यंत सेवा देत होते.

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाजवळ मूर्ती तसेच निर्माल्य संकलन करताना सिव्हिल सोसायटीचे गणवेशधारी स्वयंमसेवक, पोलीस तसेच नगरपंचायतचे कर्मचारी.

(छाया : विनायक वाडेकर)

Web Title: Farewell to Ganarayya at Muktainagar