शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:49 IST

कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (भोद बु., ता.धरणगाव) येथे सायंकाळी सहा वाजता घडली.

ठळक मुद्देजळगाव जिल्हा रुग्णालयात गोंधळपतीकडून दुसऱ्यांदा ठार मारण्याचा प्रयत्नरॉकेल टाकून पेटविण्याचा केला होता प्रयत्न

जळगाव : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (भोद बु., ता.धरणगाव) येथे सायंकाळी सहा वाजता घडली. सुवर्णा मनोज देसले (वय ३०, रा.भोद बु.ता.धरणगाव) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आॅगस्ट महिन्यातही शहरात सुवर्णा यांना अंगावर रॉकेल टाकून जिवंत पेटविण्याचा प्रयत्न झाला होता.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुवर्णा व पती मनोज देसले यांच्यात न्यायालयात केस सुरू आहे. सुवर्णा यांनी ही केस मागे घ्यावी म्हणून पतीसह सासरच्यांमध्ये वाद आहेत. पती मनोज देसले याने भोद येथील मालमत्ता विक्री करून जळगाव शहरात घर घेतले आहे. पतीवगळता संपूर्ण कुटुंब शहरातच स्थायिक आहे. सुवर्णा व मुलगा कौस्तुभ असे दोन्ही जण भोद येथे वास्तव्याला आहेत. गेल्या पाच दिवसांपासून आई शैलाबाई या सुवर्णा यांच्याकडे आलेल्या आहेत. सोमवारी सायंकाळी पती घरी आला व काही न सांगता पत्नीच्या पोटात, मांडीवर डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. आरडाओरड झाल्याने आई शैलाबाई धावत आल्या. त्यांनी सुवर्णा यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.उपचारावरून रुग्णालयात गोंधळजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर उपचार करण्यात हलगर्जीपणा तसेच यापूर्वी जिवंत ठार मारण्याचा गुन्हा दाखल असतानाही पोलिसांनी सुवर्णाच्या सासरच्यांना अटक केली नाही म्हणून छावा संघटनेच्या वंदना पाटील, रेखा पाटील, मनीषा पाटील यांनी संताप व्यक्त केला. आमदार सुरेश भोळे यांनीही रुग्णालयात जखमीची भेट घेतली. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनाही महिलांनी संशयितांच्या अटकेविषयी जाब विचारला. दरम्यान, या जखमी सुवर्णा यांची प्रकृती चिंताजनक आहे. आई व मुलाचा प्रचंड आक्रोश सुरू होता. छावा संघटनेच्या महिलांनी त्यांना धीर दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस