दामिनी आत्महत्याप्रकरणी चौकशीची कुटुंबीयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST2021-09-15T04:20:12+5:302021-09-15T04:20:12+5:30

भुसावळ : येथील माहेर व जळगाव येथील सासर असलेली दामिनी वैदकर हिने २७ ऑगस्टला गळफास घेतला होता, ...

Family members demand inquiry into Damini suicide case | दामिनी आत्महत्याप्रकरणी चौकशीची कुटुंबीयांची मागणी

दामिनी आत्महत्याप्रकरणी चौकशीची कुटुंबीयांची मागणी

भुसावळ : येथील माहेर व जळगाव येथील सासर असलेली दामिनी वैदकर हिने २७ ऑगस्टला गळफास घेतला होता, परंतु तिचा सासरचे लोक छळ करत होते. यामुळे तिला सासरच्या लोकांनी तिचे जीवन संपविले. ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रामानंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश शिंदे यांच्याकडे असून, एकतर्फी तपास होत असल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.

मयत दामिनीचे वडील, आई, बहीण भाऊ यांचा अद्यापही जबाब नोंदविण्यात आला नाही. यामुळे तपासी अधिकारी राजेश शिंदे यांच्याकडून हा तपास काढून वरिष्ठ पालीस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात यावा. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी पारनेरचे आमदार नीलेश लंके व आमदार संजय सावकारे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

यावेळी त्यांच्यासोबत ईब्टा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष एस.एस. अहिरे, बी.वाय. सोनवणे, एस.एन इंगोले, सुजीत पालवे, शरद पाटील, आर.आर. कापडणे आदी उपस्थित होते.

Web Title: Family members demand inquiry into Damini suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.