सदस्याला पळविण्यावरून गोंधळ

By Admin | Updated: November 5, 2015 00:16 IST2015-11-05T00:16:49+5:302015-11-05T00:16:49+5:30

सरपंच निवड प्रक्रिया : नगाव येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात

False confusion with the member | सदस्याला पळविण्यावरून गोंधळ

सदस्याला पळविण्यावरून गोंधळ

नंदुरबार : तालुक्यातील नगाव येथे सरपंच निवडीच्या वेळी एका सदस्याला पळविण्याचा प्रय} झाल्यानंतर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. नगावात पदाधिका:यांची निवड बिनविरोध झाली असली तरी त्याआधी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. दरम्यान, तालुक्यातील उर्वरित इतर सहाही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवड प्रक्रिया शांततेत पार पडली.} फसला. तीन दिवसांपूर्वी झालेल्या नगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे चार आणि भाजपचे तीन असे एकूण सात सदस्य निवडून आले आहेत. काँग्रेससोबतच भाजपनेही सरपंचपदासाठी अर्ज दाखल करण्याची तयारी करून ठेवली होती. त्यासाठी भाजपने काँग्रेसच्या एका सदस्याला पळविण्याचे नियोजनही केले होते. परंतु काँग्रेसच्या सदस्याला फोडण्यात अपयश आले आणि येथेच भाजपची खेळी फसली. यामुळे भाजपच्या तीनही सदस्यांनी सरपंच-उपसरपंच निवडणुकीच्या वेळी गैरहजर राहणे पसंद केले. सदस्य पळविण्याच्या गोंधळामुळे नगाव येथे ऐनवेळी वाढीव पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला. दंगा नियंत्रण पथक तसेच पोलीस पथकही दाखल झाले. पदाधिकारी निवडीच्या वेळी काँग्रेसचे चारच सदस्य हजर होते. यापैकी सरपंचपदासाठी कल्पनाबाई सुकलाल पाटील, तर उपसरपंचपदी भटू विश्राम पाटील यांचे एकेक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर सत्ताधारी गटाच्या चारही सदस्यांना पोलीस बंदोबस्तात सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी आर. डी. पेंढारकर यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेविका एन. एच. बडगुजर यांनी सहकार्य केले.

नगाव सरपंचपदी कल्पना पाटील

नगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसच्या कल्पनाबाई सुकलाल पाटील, तर उपसरपंचपदी भटू विश्राम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याआधी एका सत्ताधारी गटातील एका सदस्यास पळविण्याचा प्रय

मांजरे सरपंचपदी कविता राऊळ

मांजरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविताबाई संजयसिंग राऊळ यांची, तर उपसरपंचपदी अशोक आनंदा पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण नऊ जागांपैकी आठ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे सरपंच व उपसरपंच निवडीची प्रक्रिया बिनविरोध पार पडली. या वेळी सरपंच व उपसरपंचांसोबतच रेखाबाई विनायक पाटील, चित्राबाई दगा कोळी, प्रेमसिंग नवलसिंग राऊळ, विजयाबाई भगवान पाटील, लक्ष्मीबाई पांडुरंग ठाकरे, दगा नागो भिल या नूतन सदस्यांसोबतच माजी सरपंच दगा यादव कोळी उपस्थित होते.

शनिमांडळ सरपंचपदी सुनीता पाटील

शनिमांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसच्या सुनीता सयाजी पाटील यांची, तर उपसरपंचपदी अशोक रामभाऊ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य असून, त्यात काँग्रेसचे सात सदस्य असून, दोन सदस्य भाजपचे निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शनिमांडळचे मंडळ अधिकारी पी. एस. नेरकर यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी एम. एस. पाचोरे यांनी सहकार्य केले. निवडीनंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली. गुलाल उधळण्यात आला व फटाके फोडण्यात आले. यानंतर नूतन पदाधिकारी व कार्यकत्र्यानी नंदुरबार येथे माजी आमदार बटेसिंह रघुवंशी तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

खर्दे खुर्द सरपंचपदी मंगला चित्ते

खर्दे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगला प्रकाश चित्ते, तर उपसरपंचपदी रुखमा नाना पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचे सात सदस्य निवडून आले होते. दोन्ही उमेदवारांचे प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पवार यांनी जाहीर केले. निवडीनंतर कार्यकत्र्यानी गुलाल व फटाक्यांची आतशबाजी केली. या वेळी पंडित दगडू भिल, युवराज नाना पाटील, आक्काबाई झुलाल चित्ते, बायजाबाई तुकाराम भिल, संगीता अशोक पाटील उपस्थित होते. निवडणुकीसाठी संतोष पंडित पाटील, आधार माणिक पाटील, भबूता चिंधा पाटील, दिलीप भटा पाटील, संजय भाईदास पाटील, सयाजी तुंबडू पाटील, गोरख रूपचंद पाटील, ईश्वर चतूर पाटील, दिलीप रामदास पाटील, नवल सुकदेव पाटील, आधार धनसिंग भिल, आत्माराम लखा भिल, मल्हारी शांतीलाल पाटील, संतोष रघुनाथ भिल, बाजीराव वना पाटील, जगदीश अजरुन पाटील, प्रकाश नाना पाटील, नितीन तुकाराम पाटील, साहेबराव दंगल पाटील आदींनी सहकार्य केले.

खोक्राळे सरपंचपदी अहिल्या बोरसे

खोक्राळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अहिल्या सोनू बोरसे यांची, तर उपसरपंचपदी नारायणसिंग संपतसिंग गिरासे यांची बिनविरोध निवड झाली.

काकर्दे सरपंचपदी प्रकाश महाजन

काकर्दे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रकाश जगन्नाथ महाजन यांची, तर उपसरपंचपदी जिजाबाई पुंडलिक भापकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निंभेल सरपंचपदी उषा भिल

निंभेल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा मका भिल, तर उपसरपंचपदी लोटन पुना पवार यांची निवड झाली. सरपंचपदासाठी उषा भिल यांना चार, तर प्रतिस्पर्धी सोजल पाटील यांना तीन मते पडली. तसेच उपसरपंचपदासाठी लोटन पवार यांना चार, तर प्रतिस्पर्धी उमेदवार अजरुन लोटन पाटील यांना तीन मते पडली.

Web Title: False confusion with the member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.