अर्भकास विहिरीत फेकून माता फरार
By Admin | Updated: April 17, 2017 13:21 IST2017-04-17T13:21:28+5:302017-04-17T13:21:28+5:30
नीम येथे लोटन कोळी यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात व्यक्तीने नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे अर्भक फेकून दिल्याचे आढळून आले.

अर्भकास विहिरीत फेकून माता फरार
अमळनेर, जि. जळगाव, दि. 17 - नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे अर्भक विहिरीत फेकून माता फरार झाल्याची घटना तालुक्यातील नीम येथे 17 रोजी उघडकीस आली आहे.
नीम येथे लोटन कोळी यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात व्यक्तीने नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे अर्भक फेकून दिल्याचे आढळून आले. यात या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. याबाबत मारवाड पोलिसात खबर देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली असता बाळाची नाळ देखील कापलेली नव्हती. कोवळे शरीर असल्यामुळे जागेवरच वैद्यकीय अधिका:यांना बोलावून शवविच्छेदन करण्यात आले. अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.