शेतकऱ्यास मिळाली ५०० ची बनावट नोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:27 IST2019-05-13T18:25:24+5:302019-05-13T18:27:37+5:30

व्यापाऱ्यांमध्ये भिती

Fake notes of 500 received from farmer | शेतकऱ्यास मिळाली ५०० ची बनावट नोट

शेतकऱ्यास मिळाली ५०० ची बनावट नोट




कजगाव, ता.भडगाव : येथुन जवळच असलेल्या बोरनार येथील शेतकरी अरुण पंडित पाटील या शेतकºयास व्यवहारात ५०० ची बनावट नोट मिळाली. यामुळे कजगावच्या बाजारपेठेत बनावट नोटांचे आगमन तर झाले नाही ना ? याबाबत शंका निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाने याचा गांभीर्याने शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
अरुण पाटील यांना तीन- चार दिवसांपूर्वी पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये एक ही बनावट नोट मिळाली. मात्र सदर नोट कोणाकडून आली हे मात्र लक्षात आले नाही. कारण काही रक्कम बाहेर व्यवहारात तर काही रक्कम ही कजगावच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतून दुधाचे पेमेंटद्वारे मिळाली. यामुळे ही नोट नेमकी कोणाकडून मिळाली हे सांगणे कठीण झाले आहे. दरम्यान या प्रकारामुळे नागरिकांमध्ये व्यवहार करताना ५०० च्या नोटेबद्दल साशंकता निर्माण होत आहे.

Web Title: Fake notes of 500 received from farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.