तत्कालिन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांचेही बनावट फेसबुक अकाउंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:21 IST2021-06-16T04:21:58+5:302021-06-16T04:21:58+5:30

जळगाव : जळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी व महावितरण कंपनीचे विद्यमान कार्यकारी संचालक विजय सिंघल यांचेही फेसबुकचे बनावट अकाऊंट तयार झाले ...

Fake Facebook account of the then District Collector Vijay Singhal | तत्कालिन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांचेही बनावट फेसबुक अकाउंट

तत्कालिन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांचेही बनावट फेसबुक अकाउंट

जळगाव : जळगावचे तत्कालीन जिल्हाधिकारी व महावितरण कंपनीचे विद्यमान कार्यकारी संचालक विजय सिंघल यांचेही फेसबुकचे बनावट अकाऊंट तयार झाले असून त्याद्वारे पैशाची मागणी केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी ॲड.हारुल देवरे यांच्याकडे पैशाची मागणी झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी असलेले अॅड. हरुल देवरे यांना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विजय सिंघल यांची फेसबुक अकाउंटवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यांनी ती स्वीकारल्यानंतर अॅड. देवरे यांना मेसेज आला. कसे आहात, वगैरे औपचारिक संभाषण झाल्यानंतर आपण फोन पे युज करता का ? पैशांची गरज आहे. अशी विचारणा झाली. सिंगल हे पैसे मागू शकत नसल्याने शंका आली. हे बनावट खाते असल्याची खात्री पटली. याबाबत अद्याप पोलिसात तक्रार झालेली नाही.

Web Title: Fake Facebook account of the then District Collector Vijay Singhal