फेसबुकवरील फोटो काढून तयार केला बनावट दस्ताऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST2021-09-21T04:19:54+5:302021-09-21T04:19:54+5:30
पिंप्राळा येथील गट क्र. ३३ पैकी फ्लॅट सिस्टीमच्या इमारतीत १०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये दिनेश रामचंद्र ऊर्फ रमेशचंद्र तिवारी वास्तव्याला आहेत. ...

फेसबुकवरील फोटो काढून तयार केला बनावट दस्ताऐवज
पिंप्राळा येथील गट क्र. ३३ पैकी फ्लॅट सिस्टीमच्या इमारतीत १०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये दिनेश रामचंद्र ऊर्फ रमेशचंद्र तिवारी वास्तव्याला आहेत. या मालमत्तेच्या व्यवहारासंदर्भात तिवारी यांनी २४ जुलै २०२१ रोजी पूजा व हरिष या दाम्पत्याविरुद्ध तक्रार दिल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात जामिनावर मुक्त झाल्यानंतर झंवर यांनी गुन्ह्यातील फिर्याद वाचल्यानंतर या मिळकतीच्या संदर्भात केलेल्या सौदापावतीवर २०१७ मध्ये ३० लाख ४७ हजार ६८५ रुपयांचा, तर २०१८ मध्ये दहा लाख रुपयांचा बोजा असल्याचा उल्लेख दिसला. प्रत्यक्षात या दाम्पत्याने अशी कुठलीच सौदा पावती केलेली नव्हती. कागदपत्रांवरील साक्षीदारांनाही कधी भेटलेले नव्हते. रक्षाबंधनाच्या दिवशी काढलेले फोटो या दाम्पत्याने फेसबुकवर अपलोड केले होते. दिनेश तिवारी व त्यांच्या पत्नीचा फायदा व्हावा यासाठी वरील लोकांनी खोटा दस्ताऐवज तयार केल्याचे उघड झाल्यानंतर झंवर दाम्पत्याने सोमवारी जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार या सहा जणांविरुद्ध कट रचणे, फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.