फैजपूर श्रीमद् देवी भागवत कथा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 21:30 IST2018-12-21T21:29:08+5:302018-12-21T21:30:26+5:30

शिवराय मित्र मंडळ देवीवाडा यांच्यातर्फे श्रीमद् देवी भागवत कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान आयोजित केला आहे. श्रीकृष्ण महाराज अहमदनगर कथा वाचन करतील.

Faizpur Shrimad Devi Bhagwat Katha Week | फैजपूर श्रीमद् देवी भागवत कथा सप्ताह

फैजपूर श्रीमद् देवी भागवत कथा सप्ताह

ठळक मुद्देदेवीवाडा येथे हरिनाम संकीर्तन सप्ताहात विविध कार्यक्रम२४ ते ३१ डिसेंबर दरम्यान होणार विविध महाराजांची कीर्तने

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : शिवराय मित्र मंडळ देवीवाडा यांच्यातर्फे श्रीमद् देवी भागवत कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान आयोजित केला आहे.
श्रीकृष्ण महाराज अहमदनगर कथा वाचन करतील. तसेच महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, डोंगरदे येथील स्वरूपानंद महाराज मार्गदर्शन करतील. दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, सकाळी सहा ते ६.३० विष्णुसहस्त्रनाम सकाळी ९ ते १२, दुपारी ३ ते ५ श्रीमद् देवी भागवत कथा सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ रात्री ८ ते १० कीर्तन २४ रोजी ज्ञानेश्वर महाराज मेहुण, २५ रोजी अरुण महाराज, जामठीकर, २६ ला गोपाळ महाराज, डोणगाव, २७ रोजी विनोदाचार्य भानुदास महाराज, अमळनेर, २८ रोजी सुभाष महाराज, बुलढाणा, २९ ला विनोदाचार्य रामभाऊ महाराज, उन्हाळे ३० रोजी जयवीरसिंग महाराज, पारोळा, ३१ रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान पांडुरंग महाराज आवारकर यांचे काल्याचे कीर्तन. ३१ रोजी रात्री आठ वाजता संतोष महाराज भालेराव व संतोष महाराज अवताळे, वाशिम यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल. गायनाचार्य आनंदा महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गणेश महाराज शेगावकर मृदुंगाचार्य पांडुरंग महाराज वाशिमकर व श्री साई ग्रुप मित्र मंडळ, पेहेड मित्र मंडळ फैजपूर यांचे सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पप्पू चौधरी व शिवराय मित्र मंडळ यांनी केले आहे.

Web Title: Faizpur Shrimad Devi Bhagwat Katha Week