राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नेत्र तपासणी, मानसोपचार शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:19 IST2021-07-07T04:19:55+5:302021-07-07T04:19:55+5:30

प्रामुख्याने नेत्र तपासणी व मानसोपचार शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अमळनेर येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ ...

Eye examination, psychiatric camp by NCP Youth Congress | राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नेत्र तपासणी, मानसोपचार शिबिर

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नेत्र तपासणी, मानसोपचार शिबिर

प्रामुख्याने नेत्र तपासणी व मानसोपचार शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अमळनेर येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. कौस्तुभ दिलीप वानखेडे (ठाकूर) व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रद्धा कौस्तुभ वानखेडे (ठाकूर) आदी डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत. हे शिबिर ७ जुलै बुधवार रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल, आदित्य कॉर्नर, डी. आर. कन्या शाळेजवळ, धुळे रोड, अमळनेर येथे होणार आहे. शिबिरात मोफत सेवा देणार असून, गरजू रुग्णांनी या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन अमळनेर शहर व तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ढेकू रोडवर हरिओम नगर येथे खुल्या भूखंडात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे.

Web Title: Eye examination, psychiatric camp by NCP Youth Congress