खर्चिक व वाईट रूढी-परंपरांना फाटा
By Admin | Updated: November 24, 2015 01:02 IST2015-11-24T01:02:04+5:302015-11-24T01:02:04+5:30
तळोदा : लगAात नाचणारा घोडा आणू नये अशा खर्चिक रूढींबरोबरच चार दिवसांचे द्वारदर्शन व सात दिवसात उत्तरकार्य असे वेगवेगळे निर्णय व ठराव सर्वानुमते माळी समाजाच्या बैठकीत घेण्यात आले.

खर्चिक व वाईट रूढी-परंपरांना फाटा
तळोदा : लगAात नाचणारा घोडा आणू नये, हळद ज्याच्या त्याच्या घरीच लावावी, वधू पक्षाने रुखवत ठेवू नये, हळदीच्या रात्री बॅण्ड बंद व्हावा, अशा खर्चिक रूढींबरोबरच चार दिवसांचे द्वारदर्शन व सात दिवसात उत्तरकार्य असे वेगवेगळे निर्णय व ठराव सर्वानुमते माळी समाजाच्या बैठकीत घेण्यात आले. पदाधिका:यांच्या या धोरणात्मक निर्णयामुळे समाजात समाधान व्यक्त केले जात आहे.Aात हळद ज्याच्या त्याच्या घरीच लावण्यात यावी, हळदीच्या दिवशी रात्रीचा बॅण्ड बंद करण्यात यावा, लगAात वधू पक्षाने रुखवत देऊ नये, फोटो कार्यक्रम मर्यादित असावा, लगAाची जाहीर वेळ तंतोतंत पाळावी, वरातीत नाचणारा घोडा आणू नये, अशा खर्चिक रूढींबरोबरच उत्तरकार्य, दुखवटा सात दिवसांचा पाळावा, फक्त चौथ्या दिवशीच द्वारदर्शनाला यावे, माहेरपण फक्त सुतकीणाच बाहेर काढून न्यावे, अशा चालीरितींचा समावेश आहे. तसा ठरावदेखील सर्व संमतीनुसार पारित करण्यात आला. या वेळी अध्यक्ष ईश्वर मगरे यांनी सांगितले की, समाजातील अनिष्ठ रूढी परंपरांना फाटा देऊन बैठकीत सर्वानुमते बंद करण्यात आलेल्या ठरावांची कार्यवाही करण्यात यावी, असे आवाहन केले. या वेळी उपाध्यक्ष विनायक माळी यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सचिव मित्तलकुमार टवाळे यांनी केले. येथील काचमाळी समाज पंच मंडळाची सर्वसाधारण सभा संत सावता माळी भवनात समाजाचे अध्यक्ष ईश्वर रामा मगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत समाजातील अयोग्य, अनिष्ठ, अनावश्यक, खर्चिक व वेळखाऊ अशा परंपरेने चालत आलेल्या रूढी व परंपरांवर चर्चा करण्यात आली. या सर्व अनिष्ठ रूढी समाजाच्या विकास अन् प्रगतीला बाधक ठरत आहे. मुख्यत: याची झळ सामान्य व गरिबांनाच अधिक बसत असते. त्यामुळे अशा सर्व प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रामुख्याने लग बैठकीस अरविंद मगरे, गिरधर सागर, अनिल माळी, जयेंद्र सूर्यवंशी, अजित टवाळे, सुधीर माळी, सुनील सूर्यवंशी, पंकज राणे, आंबालाल चव्हाण, भिका माळी, काशिनाथ पिंपरे, हेमलाल मगरे, नारायण राजकुळे, मधुकर मगरे, डॉ. देवीदास शेंडे, भानुदास राजकुळे आदींसह पंच मंडळातील कार्यकारी सदस्य व समाज बांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)