मालवाहतूक चारचाकीची लांबविली बॅटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:21 IST2020-12-30T04:21:32+5:302020-12-30T04:21:32+5:30

जळगाव : रामदास कॉलनीत उभी असलेली मालवाहतूक चारचाकीची पाच हजार रुपये किमतीची बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस ...

Extended four-wheeled battery | मालवाहतूक चारचाकीची लांबविली बॅटरी

मालवाहतूक चारचाकीची लांबविली बॅटरी

जळगाव : रामदास कॉलनीत उभी असलेली मालवाहतूक चारचाकीची पाच हजार रुपये किमतीची बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चारचाकीमालक राजेंद्र पुंडलिक पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र पाटील हे वाघनगरात कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. ते मोठ्या भावाच्या फटाक्यांच्या दुकानात कामाला असून, मालवाहतूक वाहन (क्र. एमएच १९ सीवाय ५८०५) चालवून उदरनिर्वाह करतात. रविवारी (दि. २७) रात्री काम आटोपून नेहमीप्रमाणे रामदास कॉलनीत राहत असलेले मोठे भाऊ धनंजय पाटील यांच्या घराजवळ चारचाकी उभी केली. त्यानंतर घरी निघून गेले. सोमवारी (दि. २८) सकाळी ९ वाजता चारचाकीजवळ येऊन ती सुरू करण्याचा प्रयत्न केला असता ती सुरू झाली नाही. अखेर त्यांना चारचाकीतील बॅटरी कुणीतरी चोरून नेल्याचे पहावयास मिळाले. शेवटी मंगळवारी राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध पाच हजार रुपये किमतीची बॅटरी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Extended four-wheeled battery