बेपत्ता कापूस व्यापार्‍याचा खून झाल्याचे उघड

By Admin | Updated: February 3, 2015 17:18 IST2015-02-03T17:18:57+5:302015-02-03T17:18:57+5:30

गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बाळू रामू पाटील (४२ रा. जहांगीरपुरा, एरंडोल) या कापूस व्यापार्‍याचा खून करून मृतदेह पाटाच्या पाण्यात फेकून देण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

Explained that the missing cotton trader was murdered | बेपत्ता कापूस व्यापार्‍याचा खून झाल्याचे उघड

बेपत्ता कापूस व्यापार्‍याचा खून झाल्याचे उघड

धरणगाव : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बाळू रामू पाटील (४२ रा. जहांगीरपुरा, एरंडोल) या कापूस व्यापार्‍याचा खून करून मृतदेह पाटाच्या पाण्यात फेकून देण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. 
दरम्यान, त्यांच्या खिशात ५0 हजारांची रक्कम जैसे थे आढळून आली आहे. मोठा माळीवाडालगत असलेल्या पाटाच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना आढळला. तो एरंडोल येथील कापूस व्यापार्‍याचा असल्याचे निष्पन्न झाले.

३0 जानेवारीच्या रात्रीपासून बाळू बेपत्ता होते. २ रोजी सकाळी बाळू पाटील यांचा मृतदेह पाटात दिसल्याने नगरसेवक मधुकर रोकडे यांनी पोलिसांना माहिती दिली. बाळू यांच्या डोक्यात कुर्‍हाडीसारख्या तीक्ष्ण हत्याराने घाव घालून गळ्याला दोरीने आवळून ठार मारल्याचा संशय आहे. खिशातील ५0 हजारांची रोकड सुरक्षित असल्याने पोलीसही संभ्रमात पडले आहेत. त्यांची मोटारसायकल (क्र.एमएच-१९-१0५२) ही हिंगोणे-जवखेडेदरम्यान पाटचारीलगत आढळली. 

Web Title: Explained that the missing cotton trader was murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.