कालबाह्य शीतपेयाचा साठा केला नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 22:37 IST2020-03-20T22:37:28+5:302020-03-20T22:37:34+5:30
भोकरी : बेवारस आढळल्या होत्या बाटल्या

कालबाह्य शीतपेयाचा साठा केला नष्ट
केºहाळे, ता. रावेर : भोकरी गावाजवळ बेवारस स्थितीत आढळलेली व कालबाह्य झालेली शीतपेये शुक्रवारी पोलिसांनी नष्ट केली.
याबाबत वृत्त असे की, येथील पोलिस पाटील वर्षा प्रविण पाटील या सकाळी कामानिमित्त रावेर येथे जात असताना त्याना भोकरी जवळ काटेरी झुडपामध्ये फेकलेल्या अवस्थेत आढळून आले. जवळून पाहिले असता शीतपेय कालबाह्य झाले असल्याचे आढळून आले.
या शीतपेयांच्या बाटल्या परीसरातील लहान मुलांनी घरी नेऊन ते प्राशन केले तर काही शारीरिक त्रास झाला असता.
मात्र वर्षा पाटील यांनी तत्काळ रावेर पोलिस स्टेशनचे पो. नि. रामदास वाकोड यांना माहीती दिली. त्यांनी लगेच ए.पी. आय कदम, पोलीस कर्मचारी निलेश चौधरी, तडवी यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी घटनेचे गांभीर्य पाहता शित पेय जप्त करून ते नष्ट केले.